आज मुंबईत पुरस्कारांचे वितरण
शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयासाठी देण्यात येणाऱ्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार’ आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. शनिवार, २१ मे रोजी मुंबईत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे पुरस्कार २०१३-१४ या वर्षांसाठीचे आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार (शहर विभाग) : शारदा वाचनालय, (गोंदिया ), विठ्ठलनाथ संस्थान संचलित गीता ग्रंथालय (विरार) मंगला रघुनाथ केडगे वाचनालय (सांगली), डॉ. शामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय (चंद्रपूर). ग्रामीण विभाग : शिवाजी सार्वजनिक वाचनालय (मांगले, जिल्हा-सांगली), विकास वाचनालय (लोणी, जिल्हा-पुणे,)छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय (शिवपूर, जिल्हा-लातूर), लक्ष्मणराव शामराव मुंडे सार्वजनिक वाचनालय (टोकवाडी, जिल्हा-बीड)
डॉ.एस.आर.रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार : राज्यस्तर (कार्यकर्ता)- राम हनमंतराव देशपांडे, अमरावती, (सेवक)-आत्माराम बाबुराव कांबळे, लातूर), विभाग स्तर (कार्यकर्ता)-अमरावती-अरूणा सदाशिव कुल्ली, बुलढाणा, औरंगाबाद-देवीदास भगवानराव देशपांडे, औरंगाबाद, नागपूर-डॉ.श्रावण किसनजी उके, गोंदिया, नाशिक-सतिश उत्तमराव पाटील, धुळे, पुणे-रमेश धोंडिबा सुतार, पुणे, मुंबई-नागेश मधुकर कुलकर्णी, अलिबाग (रायगड), विभाग स्तर (सेवक)- अमरावती-प्रमोद आनंदराव वानखडे, अमरावती. औरंगाबाद-सुर्यकांत महािलग शिरसे, लातूर, नागपूर-निरंजन दयाराम शिवणकर, भंडारा, नाशिक-राजेश वामन शिरसाट, नाशिक, पुणे-विठ्ठल डोमाजी क्षीरसागर, पुणे, मुंबई-भालचंद्र भाऊ वर्तक, अलिबाग (रायगड) यांचा समावेश आहे.