25 September 2020

News Flash

पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचा करोनाने मृत्यू

ताडदेव पोलीस ठाण्याच्या इमारतीतच कु टुंबासह वास्तव्य करणारे पटेल राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत होते

मुंबई : पोलीस निरीक्षक आझम पटेल (५०) यांचा बुधवारी पहाटे सैफी रुग्णालयात करोना संसर्गाने मृत्यू झाला. राज्यात करोनाबाधित पोलिसांचा आकडा १० हजारांवर गेला आहे.

ताडदेव पोलीस ठाण्याच्या इमारतीतच कु टुंबासह वास्तव्य करणारे पटेल राज्य गुप्तवार्ता विभागात कार्यरत होते. याआधी त्यांनी गुन्हे शाखा, राष्ट्रीय तपास यंत्रणेत कर्तव्य बजावले होते. पटेल यांच्याकडे खबऱ्यांचे जाळे होते आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे गोपनीय, गुप्त माहितीचा संचय होता. त्यामुळेच मुंबई पोलिसांसह केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, दिल्ली स्पेशल सेल आणि अन्य राज्यांतील महत्त्वाच्या विभागांत कार्यरत अधिकारी पटेल यांच्या संपर्कात असत. त्यांनी वेळोवेळी अनेक संवेदनशील प्रकरणांमध्ये विविध तपास यंत्रणांना मोलाचे सहकार्य के ले होते.

पूर्वग्रहदूषित नसलेले, प्रामाणिक, अभ्यासू अधिकारी अशी त्यांची ओळख होती. मुंबईतील तेल माफियांच्या टोळीयुद्धात एका म्होरक्याची हत्या घडली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. मात्र प्रतिस्पर्धी म्होरक्या हाती लागत नव्हता. या म्होरक्याचा मुंबईतला नेमका ठावठिकाणा पटेल यांनी तत्कालीन तपासकर्त्यांना दिला. म्होरक्या हाती लागलाच मात्र त्या ठिकाणी तपासाला दिशा, गती देणारे महत्त्वाचे पुरावेही गुन्हे शाखेच्या हाती लागले. सेनेच्या एका नगरसेवकाने जेजे उड्डाणपुलावर गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देणारा फलक लावला होता. तो स्थानिकांनी फाडला. त्यावरून दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. ही परिस्थिती पटेल यांनी दोन्ही समाजातील जनसंपर्काच्या जोरावर अवघ्या काही क्षणांत नियंत्रणात आणली आणि तणाव निवळला.

१०७ जणांचा मृत्यू

राज्यात करोनाबाधित पोलिसांचा आकडा १० हजारांवर गेला आहे. राज्यात आतापर्यंत १० हजार २६ अधिकारी, अंमलदार बाधित झाले. त्यापैकी आठ हजार ६० जणांनी करोनावर मात के ली. तर एक हजार ८५९ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १०७ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती राज्य पोलीस मुख्यालयातून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2020 2:29 am

Web Title: state intelligence officer azam patel dies from covid 19 zws 70
Next Stories
1 दक्षिण मुंबईत अतिवृष्टी
2 राज्यातील शाळा ‘गुगल क्लासरुम’वर
3 मुंबईत ९१० नवे रुग्ण
Just Now!
X