शिवसेना नेते आणि जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांना आज हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने, मुंबईच्या लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आल आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची रूग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वीसुद्धा त्यांना हृदयाचा त्रास जाणवल्याने लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी योग्य ते उपचार त्यांनी करवून घेतले होते. त्यानंतर आज पुन्हा हा त्रास उद्भवल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. शिवतारे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेना नेत्यांनी रूग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीविषयी विचारपूस केली.