जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यक परिषद या सक्षम यंत्रणांनी प्रमाणीकरण केल्याशिवाय पतंजलीच्या ‘कोरोनिल’ औषधाच्या विक्रीला राज्यात परवानगी दिली जाणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.
बाबा रामदेव यांच्या कंपनीने तयार केलेल्या औषधाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. औषधाच्या वैद्यकीय चाचणीवर भारतीय वैद्यक परिषदेने आक्षेप घेतले आहेत. हे औषध करोनावर उपयुक्त असल्याचा पतंजली कं पनीचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने फे टाळला आहे. इतक्या घाईत हे औषध बाजारात आणणे आणि त्याच्या कार्यक्र माला नितीन गडकरी आणि हर्षवर्धन या दोन मंत्र्यांनी उपस्थित राहणे चुकीचे होते. हा सारा गोंधळ लक्षात घेता महाराष्ट्रात पतंजली कंपनीच्या करोनावरील औषधाच्या विक्रीला परवानगी दिली जाणार नाही, असे देशमुख यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 24, 2021 12:18 am