09 August 2020

News Flash

थंडीची चाहूल

राज्यातील कमाल तापमानात घट

(संग्रहित छायाचित्र)

 

राज्यात सध्या कोरडय़ा हवामानाची स्थिती असतानाच उत्तरेकडून थंड वारे वाहत आहेत. अरबी समुद्रातील चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली आहे. परिणामी थंडीची चाहूल लागली आहे.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासूनच राज्यातील किमान तापमानात चांगलीच घट होत असली आणि थंडीची चाहूल लागली असली तरी कमाल तापमान ३० अंशाच्या आसपास राहिले होते. मात्र रविवारी मुंबई आणि कोकण किनारपट्टी वगळता सर्वत्र कमाल तापमान ३० अंशांखाली घसरले. तर मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र किमान तापमान १२ ते १४ अंश सेल्सियस दरम्यान होते. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर, यवतमाळ आणि बुलढाणा या ठिकाणी १२ अंश नोंदविण्यात आले.

तापमानाच्या दिर्घकालिन पूर्वानुमानानुसार १९ डिसेंबपर्यंत राज्यातील कमाल तापमान २८ अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर त्यानंतर अनेक ठिकाणी कमाल तापमान २५ अंशाच्या दरम्यान असू शकते. तर १९ डिसेंबपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान १४ ते १७ अंश दरम्यान, मध्य महाराष्ट्रात १७ ते २० दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाडा आणि विदर्भात तापमान १४ च्या खाली, तर मध्य महाराष्ट्रात १७ अंश सेल्सियसच्या खाली जाऊ शकते.  दरम्यान अरबी समुद्रात दक्षिणपश्चिमेस रविवारी दुपारी कमी दाबाचे प्रभावी क्षेत्र निर्माण झाले आहे. २४  तासांत त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

हवामानाची स्थिती?

रविवारी राज्यातील सर्वाधिक कमी तापमान नागपूर येथे ११.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. विदर्भामध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, वर्धा आदी ठिकाणचे रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा खाली आले आहे. त्यामुळे या भागात चांगलाच गारवा आहे. मराठवाडय़ातही बहुतांश ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या जवळ आले आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, महाबळेश्वर आणि नाशिक परिसरात १३ ते १४ अंशांवर किमान तापमान आहे. कोकण विभागात रत्नागिरीचे किमान तापमान सरासरीजवळ आले आहे. मुंबईतील किमान तापमान अद्याप सरासरीच्या तुलनेत २.३ अंशांनी अधिक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 12:46 am

Web Title: state will witness a rise of eleven in a week abn 97
Next Stories
1 राज्याची केंद्राकडे ७ हजार २८ कोटींची मागणी
2 मध्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक नाही, पण …
3 राज्यातील कैद्यांची कर्करोग, मानसिक आरोग्याची तपासणी
Just Now!
X