News Flash

‘… तरीही शर्जिलवर कारवाई नाही’

शर्जिलच्या वादग्र्रस्त विधानाबद्दल राज्य सरकारने केवळ भारतीय दंड विधानातील १५३ अ नुसार गुन्हा नोंदविला आहे.

हिंदूंबद्दल वादग्रस्त विधाने केलेल्या शर्जिल उस्मानीविरुद्ध कारवाई करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात करूनही केवळ जबाब नोंदविण्यात आला, अशी टीका करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी किती लोकांना वाचविणार, असा सवाल मुख्यमंत्र्यांना केला.

शर्जिलच्या वादग्र्रस्त विधानाबद्दल राज्य सरकारने केवळ भारतीय दंड विधानातील १५३ अ नुसार गुन्हा नोंदविला आहे. मात्र हिंदू धर्मावर टीका केल्याने प्राथमिक माहिती अहवालातील नोंदीनुसार भादंवितील कलम २९५ अ नुसार, त्याचबरोबर न्याययंत्रणा व प्रशासनाविरोधात युद्ध पुकारल्याने भादंवितील कलम १२४ अ नुसारही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 12:44 am

Web Title: still no action taken against sharjeel abn 97
Next Stories
1 पत्रकार परिषद कशासाठी घेण्यात आली?
2 वाझे यांचे तीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळले
3 दिग्दर्शकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अभिनेत्रीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
Just Now!
X