05 July 2020

News Flash

शेअर दलालाची आत्महत्या

मुलुंडच्या बी. आर. मार्गावरील बहुमजली इमारतीत मनीष पत्नी, मुलासोबत वास्तव्यास होते

प्रतिनिधिक छायाचित्र

मुंबई : भांडवली बाजारातील दलाल मनीष ठक्कर यांनी गुरुवारी रात्री मुलुंड येथील इमारतीच्या १५व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.  भांडवली बाजारातील दलालीच्या व्यवसायातील तोटय़ामुळे मनीष गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्येच्या गर्तेत होते. त्यांच्यावर मनोविकारतज्ज्ञांचे उपचारही सुरू होते. रात्री १५व्या मजल्यावरील गच्ची त्यांनीच उघडली आणि काही क्षणात त्यांनी स्वत:ला खाली झोकून दिले. त्यांचे नैराश्य आणि उपचार याबाबत कुटुंबानेच पोलिसांना माहिती दिली. मुलुंडच्या बी. आर. मार्गावरील बहुमजली इमारतीत मनीष पत्नी, मुलासोबत वास्तव्यास होते. त्यांच्यावर फारसे कर्ज नव्हते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:01 am

Web Title: stock broker suicide in mumbai zws 70
Next Stories
1 विधानसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबतचा अंतिम निर्णय राज ठाकरेंचाच!
2 मुंबईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला, अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी
3 परप्रांतियांविरोधात भूमिका घेणारं ठाकरे घराणं मूळचं बिहारचंच, प्रबोधनकारांनी केला होता खुलासा
Just Now!
X