ड्रग्स माफियांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान आज मुंबईतील अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) विभागीय टीमने आज छापा मारून अंमली पदार्थांचा साठा जप्त केला.

यामध्ये ५९० ग्रॅम हॅशिस, ०.६४ ग्रॅम एलएसडी शीट, ३०४ ग्रॅम मारिजुआना यामध्ये इंम्पोर्टेड मारिजुआना कॅप्सूलचा देखील समावेश होता. याचबरोबर १ लाख ८५ हजार २०० रुपयांची रोकड व ५ हजार इंडिनेशियन रुपिया देखील हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांनी अनुज केशवानी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या अगोदर पोलिसांनी अंमली पदार्था तस्करी प्रकरणी अटक केलेल्या कैझान इब्राहीम यांच्या चौकशीत त्याने अनुज केशवानी याचे नाव उघड केले होते. अनुज केशवानी हा त्याचा या अंमली पदार्थांसाठीचा पुरवठादार होता. जप्त करण्यात आलेल्या एलएसडीचे प्रमाण हे एनडीपीएस कायद्यानुसार व्यावसायिक प्रमाण आहे.