News Flash

मुंबईमध्ये आता ‘स्ट्रीट फेस्टिव्हल’

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने ‘बल्लार्ड इस्टेट महोत्सव’ येत्या २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीने ‘बल्लार्ड इस्टेट महोत्सव’ येत्या २४ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. हेमामालिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. महोत्सवाचे नियोजन ‘फेरिसव्हील एन्टरटेन्मेन्ट’ या संस्थेने केले असून यावर्षांच्या मे महिन्यापर्यंत दर आठवडय़ाचा शनिवार व रविवार सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात खाद्य, मनोरंजन, लहान मुलांच्या खेळाचा विभाग असणार आहे. मनोरंजन विभागात खुला रंगमंच, महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारे लोकनृत्य सादर करण्यात येणार आहे. महोत्सवा’साठी १०० ते १५० पर्यंत प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे. मुंबईच्या फोर्ट भागाला ऐतिहासिक महत्त्व लाभले असून हा भाग नेहमीच गजबजलेला असतो. त्यामुळे ‘बल्लार्ड इस्टेट’ महोत्सवामुळे हा भाग अधिक जिवंत होईल, असा विश्वास ‘फेरिसव्हील एन्टरटेन्मेन्ट’च्या संचालक शुभ्रा भारद्वाज यांनी दाखवला आहे. ‘बल्लार्ड इस्टेट महोत्सवा’मुळे लोकांचे मनोरंजन तर होईलच त्याशिवाय परदेशी पर्यटकांना मुंबईतील रस्त्यांवर आयोजित केलेल्या महोत्सवाचा अनुभव घेता येईल,असे मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष रवी परमार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2016 1:38 am

Web Title: street festival in mumbai
Next Stories
1 टीईटीची ‘प्रश्नपत्रिका क्रमांक १’ची फेरपरीक्षा
2 सातवे हृदयरोपण
3 तंत्रशिक्षण संचालनालयाचा कारभार अधांतरी!
Just Now!
X