सांताक्रूझमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करून पालिकेकडून रोज १७५ युनिट वीजनिर्मिती

मुंबईतील कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला असताना महापालिकेच्या एका पथदर्शी प्रकल्पामुळे जागच्या जागी कचऱ्याची विल्हेवाट लागण्यासोबतच त्यातून वीजही उपलब्ध होऊ लागली आहे. सांताक्रूझमधील कलिना परिसरातील बडय़ा कंपन्यांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्यातून वीजनिर्मितील करून या भागातील पथदिवे प्रकाशमान करण्यात पालिकेला यश आले आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पातून दररोज १७५ युनिट विजेसोबतच २२५ किलो खतनिर्मितीही होऊ लागली आहे.

Rats in operating theaters of V N Desai Hospital
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहांमध्ये उंदरांचा सुळसुळाट
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

मुंबईमध्ये दररोज तब्बल ९ हजार मेट्रिक टन घनकचरा (कचरा व डेब्रिज) निर्माण होतो. मुंबईमधील देवनार, कांजूर आणि मुलुंड कचराभूमींची क्षमता संपुष्टात आल्याने या कचऱ्याची विल्हेवाट लावणे पालिकेला अवघड बनले आहे. रस्त्यावर कचरा पडू नये आणि मुंबई बकाल दिसू नये म्हणून पालिकेने आणलेली शून्य कचरापेटी योजना अयशस्वी ठरत असतानाच पालिकेच्या ‘एच-पूर्व’ विभाग कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी पुढाकार घेत ऑर्गेनिक वेस्ट रिसायकलिंक प्रा. कंपनीच्या मदतीने सांताक्रूझमधील कलिना परिसरातील विण्डसर लेनमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा छोटेखानी प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पात दररोज एक मेट्रिक टन कचऱ्यापासून १७५ युनिट वीजनिर्मिती केली जात आहे. विण्डसर लेनमध्ये काही मोठय़ा कंपन्यांची कार्यालये असून या कार्यालयांमध्ये दररोज ९०० किलो कचरा निर्माण होतो. हा कचरा या प्रकल्पासाठी वापरला जातो. उर्वरित कचरा याच परिसरातून उपलब्ध होतो. या प्रकल्पात निर्माण होणाऱ्या विजेचा वा्रापर विण्डसर लेन आणि सी.एस.टी. रोडवरील ४० दिवे प्रकाशमान करण्यासाठी होत आहे. तसेच काही विजेचा वापर हा प्रकल्प चालविण्यासाठी करण्यात येत आहे. या प्रकल्पातून दर दिवशी २२५ किलो खत निर्माण होणार आहे. या खताचा वापर पालिकेच्या बगिचांसाठी करण्यात येणार आहे. कचऱ्याची तिथल्या तिथेच विल्हेवाट लावली जात असल्याने कचरा उचलण्यासाठी लागणारा खर्चही वाचला आहे.

ऑर्गेनिक वेस्ट रिसायकलिंक प्रा. कंपनीने सहा महिन्यांसाठी हा प्रकल्प विनाशुल्क उभारून दिला आहे.

हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य ठिकाणी तो उभारण्याचा पालिकेचा विचार आहे. मुंबईत मोठय़ा प्रमाणावर कचरा निर्माण होणारी ठिकाणे, मोठय़ा सोसायटय़ांमध्ये हा प्रकल्प राबविल्यास तिथल्या तिथे कचऱ्याची विल्हेवाट लागेल, वीज उपलब्ध होईल आणि बगिचासाठी खतही मिळू शकेल. अशाच प्रकारचा प्रयोग गोळीबार उदंचन केंद्राजवळ करण्याचा विचार वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. मात्र या प्रकल्पामुळे शून्य कचरा मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने पालिकेने एक पाऊल पुढे टाकले आहे.

कचऱ्यापासून छोटे वीजनिर्मिती प्रकल्प उभारल्यास त्याच परिसरातील कचऱ्याची त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणे शक्य होईल. असे कचऱ्यापासून छोटे वीजनिर्मिती प्रकल्प कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्याचा विचार आहे. त्यासाठी काही कंपन्यांबरोबर संपर्कही साधण्यात आला आहे.

– प्रशांत गायकवाड, सहाय्यक आयुक्त, एच-पूर्व पालिका कार्यालय