03 December 2020

News Flash

एलबीटी रद्द केल्यास राज्यातील पालिका तीन दिवस बंद

जकात रद्द करून एलबीटी आणण्यास विरोध करणाऱ्या कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी घुमजाव करत आता एलबीटीला पाठिंबा दिला आहे.

| November 22, 2014 03:53 am

जकात रद्द करून एलबीटी आणण्यास विरोध करणाऱ्या कामगार संघटनेचे नेते शरद राव यांनी घुमजाव करत आता एलबीटीला पाठिंबा दिला आहे. व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून एलबीटी रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास ११ ते १३ डिसेंबरदरम्यान राज्यातील सर्व पालिकांचे कर्मचारी काम बंद ठेवतील व व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्यास ती फोडली जातील, असा जाहीर इशारा शरद राव यांनी दिला.
महापालिकांना जकातीचे उत्पन्न मिळाले नाही तर कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळणार नाहीत, असे सांगत गेल्या वर्षी राव यांनी एलबीटीला विरोध केला होता.
एलबीटीमुळे चांगले उत्पन्न जमा होत असल्याचे लक्षात आले आहे, मात्र पालिकांना अनुदान मिळवण्यासाठी सहा-सहा महिने वाट पाहावी लागते, त्यामुळे धुळे, नंदुरबार येथील पालिका कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर मिळत नाहीत, असे सांगतानाच शरद राव यांनी एलबीटी रद्द न करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2014 3:53 am

Web Title: strick against cancellation of lbt by union leader sharad rao
टॅग Lbt,Sharad Rao
Next Stories
1 पुन्हा इंदू मिलचा ताबा घेण्याचा इशारा
2 मध्य, हार्बरवर आज मेगाब्लॉक
3 बँक ऑफ इंडियाच्या अतिक्रमणावर हातोडा
Just Now!
X