सुट्टय़ांच्या हंगामात रेल्वे गाडय़ांच्या तिकिटांना मिळणाऱ्या वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी दलाल अद्यावत तंत्रज्ञानाच्या मदतीने रेल्वे तिकीट प्रक्रियेत बेकादा शिरकाव करत असल्याचे उघडकीस आले आहे.

यात एका विशिष्ट सॉफ्टवेअपरच्या काळाबाजार करणाऱ्या दलालांवर रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी कारवाई केली. यात त्यांच्याकडून १ लाख ७३ हजारांच्या तिकीटे जप्त केली. याशिवाय रोख २८ हजार १०० रुपये, भ्रमणध्वनी, संगणक, प्रिंटर, आरक्षण अर्ज, क्रेडिट कार्ड, ओळखपत्र आदी वस्तूहीं जप्त करण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या तिकिटांसाठी ‘इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन’तर्फे पॅसेंजर रिझव्हेंशन यंत्रणा राबवली जाते. देशभरात एकाचवेळी कार्यान्वित होणाऱ्या या व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शिरणाचे तंत्र काही दलालांनी मिळवले आहे. त्याआधारे तिकिटांचा काळाबाजार केला जात असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाने केलेल्या चौकशीदरम्यान समोर आले आहे.