प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संचारबंदी लागू असूनही नागरिक त्याचे पालन करताना दिसत नाहीत. रस्त्यांवर गर्दी होत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास पोलीस दलाकडून निर्बंधांची अंमलबजावणी कठोरपणे राबवली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी शुक्र वारी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांचा आढावा घेत निर्बंधांची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस दलाला दिल्याचे त्यांनी स्पष्ट के ले. शहरात सकाळी ११ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत ज्या भागात गर्दी होते तेथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात के ले जाईल. त्या भागात करोना प्रतिबंधात्मक नियम न पाळणाऱ्या, विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.