News Flash

वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रदूषण रोखण्यासाठी कडक उपाययोजना

‘एमएमआरडीए’च्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास एक ते पाच हजार रुपये दंड

‘एमएमआरडीए’च्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास एक ते पाच हजार रुपये दंड

मुंबई : हवेचा गुणवत्ता निर्देशांक कायम वाईट ते अतिवाईट स्तरावर असणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलातील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दंडात्मक कारवाईचे निर्देश जारी केले आहेत. प्रदूषण रोखण्याचे निर्देश न पाळणाऱ्यांवर एक ते पाच हजार दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दररोज संध्याकाळी संकुलातील रस्ते धुण्यात येणार आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुलात सध्या उन्नत मेट्रो मार्ग, भुयारी मेट्रो मार्गाची कामे सुरू आहेत. मेट्रोसाठी कास्टिंग यार्डदेखील आहे. या सर्व कामांमुळे धूलीकण हवेत पसरून प्रदूषणात वाढ होते. या संदर्भात २६ डिसेंबरला झालेल्या आढावा बैठकीत एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांनी प्रदूषण रोखण्यासाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत.

मेट्रो कास्टिंग यार्डमध्ये प्रदूषण कमी होण्यासाठी पाण्याचा वापर करायचा असून मेट्रो पर्यवेक्षकाने त्याची खातरजमा करायची आहे. या निर्देशांचे उल्लंघन केल्यास दरदिवशी पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच कास्टिंग यार्डमधून बाहेर पडणाऱ्या वाहनांचे टायर्स स्वच्छ करुनच रस्त्यावर येतील याची काळजी कंत्राटदारांनी घ्यायची आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास कंत्राटदारास दररोज पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल.

मेट्रो ३ या भुयारी मार्गिकेच्या स्थानकाचे, मार्गाचे कामदेखील संकुलात सुरू आहे. त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना आखण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यात अपयशी ठरल्यास संबंधितांवर पाच हजार रुपये दंडात्मक करण्यात येईल.

एमएमआरडीए मैदान स्वच्छ न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

एमएमआरडीए मैदानात अनेक कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येते. त्या दरम्यान तात्पुरते बांधकाम केले जाते. त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचा वापर करण्याचा निर्देश दिले आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर साचलेला कचरा हटवणे आणि मैदान स्वच्छ करण्याची जबाबदारी आयोजकांची असून तसे न केल्यास अनामत रक्कम दंड म्हणून जप्त करण्यात येईल. त्याचबरोबर बेकायदा पार्किंग रोखण्यासाठीदेखील अशा वाहनचालकांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तसेच संकुलातील हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची वाहने अनेकदा रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेत उभी करण्यात येतात. हॉटेल व्यवस्थापनाने ही वाहने पहिल्या मार्गिकेत असतली याची खबरदारी घ्यायची आहे. दुसऱ्या मार्गिकेत वाहने आढळल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 4:00 am

Web Title: strict measures to prevent pollution in bandra kurla complex zws 70
Next Stories
1 पैशाच्या पावसाचे आमिष दाखवणाऱ्याला अटक
2 सीएसएमटी-ठाणे भुयारी मार्गाची राज्य सरकारकडून चाचपणी
3 शिवसेनेपेक्षा  राष्ट्रवादीच बरी! भास्कर जाधव यांची भावना
Just Now!
X