News Flash

बनावट ओळखपत्रावर लोकल प्रवासाची धडपड

बहुतांश स्थानकांतील पूर्व व पश्चिमेकडील प्रत्येकी दोन ते तीन प्रवेशद्वारेच सुरू ठेवण्यात आली.

केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली असल्यामुळे शुक्रवारी सर्व रेल्वे स्थानकांमध्ये पोलीस प्रत्येक प्रवाशाची ओळखपत्र पडताळणी करूनच स्थानकात प्रवेश देत होते.   (छायाचित्र : दीपक जोशी)

प्रवाशांचा लोकल प्रवासासाठी प्रयत्न;  विनातिकीट प्रवासी पोलिसांच्या जाळ्यात

मुंबई : राज्य सरकारने सामान्य प्रवाशांच्या लोकल प्रवासावर निर्बंध घातल्यानंतरही शुक्रवारी अनेकांनी लोकलमधून प्रवास करण्याचा प्रयत्न के ला. यासाठी काहींनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या बनावट ओळखपत्राचा आधार घेत, तर काहींनी विनातिकीट प्रवासाचा प्रयत्न मध्य रेल्वेवर के ल्याचे उघडकीस आले. तिकीट तपासनीस व रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात हे प्रवासी अडकले. यावेळी मध्य व पश्चिम रेल्वेतून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा असल्याने त्यांनाच स्थानकात प्रवेश देण्यासाठी रेल्वे पोलीस व कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

गुरुवारी रात्रीपासून केंद्र व राज्य सरकारबरोबरच वैद्यकीय कर्मचारी आणि वैद्यकीय उपचारांसाठी जाणाऱ्यांनाच मध्य आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर प्रवासाची परवानगी देण्यात आली. शुक्रवार सकाळपासून याची कठोर अंमलबजावणी सुरू झाली. त्यानुसार बहुतांश स्थानकांतील पूर्व व पश्चिमेकडील प्रत्येकी दोन ते तीन प्रवेशद्वारेच सुरू ठेवण्यात आली. शिवाय जनसाधारण तिकीट सेवा, मोबाइल तिकीट सेवा व एटीव्हीएम सेवा बंद करण्यात आली. जेणेकरून या सेवांमधून तिकीट मिळवून अन्य प्रवासी प्रवास करू शकणार नाहीत. शुक्र वारी स्थानकात प्रवेशद्वारांजवळच लोहमार्ग पोलीस, रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच तिकीट तपासनीसही तैनात होते. ओळखपत्र व तिकीट पाहूनच प्रवाशांना स्थानकांमध्ये प्रवेश दिला जात होता.

सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास परवानगी नसल्याने काही मंडळींनी अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांचे बनावट ओळखपत्राद्वारे प्रवास करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. अशा प्रवाशांना मध्य रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी पकडले. २५ प्रवाशांकडून बनावट ओळखपत्र जप्त करण्यात आले.

आतापर्यंत ६०० जणांवर कारवाई

जून २०२० मध्ये अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी होती. काही सामान्य प्रवाशांनीही लोकल प्रवासासाठी अत्यावश्यक सेवेत नोकरी करीत असल्याची बनावट ओळखपत्रे बनवून घेतली होती. मध्य रेल्वेवरील विविध स्थानकांमध्ये डिसेंबर २०२० पर्यंत ६०० हून प्रवाशांना अधिक बनावट ओळखपत्राच्या आधारे प्रवास करताना पकडण्यात आले होते. पश्चिम रेल्वेवरही अशा प्रकारे कारवाई करण्यात आली होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2021 12:03 am

Web Title: struggle of local travel on fake identity card akp 94
Next Stories
1 प्राणवायूसाठी २४ तास पूर्वमागणी आवश्यक
2 वैद्यकीय तपासणीनंतरच रुग्णशय्या वितरण
3 नाटकाच्या बसचा ‘पांढरा हत्ती’ निर्मात्यांना अवजड
Just Now!
X