26 September 2020

News Flash

दिव्यात विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू

रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वीज वाहिनी पडल्याने, पाण्यात पसरलेल्या वीजेचा शॉक लागून दिवा पूर्व परिसरात राहाणाऱ्या एका १३ वर्षीय शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला़ त्यामुळे या

| June 27, 2013 05:39 am

रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वीज वाहिनी पडल्याने, पाण्यात पसरलेल्या वीजेचा शॉक लागून दिवा पूर्व परिसरात राहाणाऱ्या एका १३ वर्षीय शालेय विद्यार्थीनीचा मृत्यू झाला़  त्यामुळे या परिसरात संतापाचे वातावरण आहे.  सिद्धी संतोष आखाडे आपल्या बहिणीसह बुधवारी दुपारी शाळेत निघाली होती. मुंब्रा देवी कॉलनी परिसरात महावितरणची वीज वाहिनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पडली होती. त्यामुळे पाण्यात वीजेचा प्रवाह पसरला होता. पाण्यात पाय टाकताच सिद्धीला वीजेचा जबरदस्त धक्का बसला. या अपघातात सिद्धी
मृत्युमुखी पडली तर तिची मोठी बहीण रिद्धी (१४) गंभीर जखमी झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी याच भागात वीजेच्या धक्क्याने दोन श्वानांचा मृत्यू झाल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले. या भागातील ट्रान्सफार्मरवर वीजेचा अतिभार आल्याने कंडक्टर तुटला व लघु दाबाची विद्युत वाहिनी तुटून हा अपघात झाला, असे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितल़े

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 5:39 am

Web Title: student dies of electric shock
टॅग Electric Shock
Next Stories
1 काटईजवळ जलवाहिनी फुटली
2 आता एकच ‘स्मार्ट कार्ड’
3 वांद्रय़ाच्या नाल्यात ८० झोपडय़ा !
Just Now!
X