21 September 2020

News Flash

कामोठय़ात विद्यार्थ्यांचे आंदोलन

वर्गाची दुरवस्था झालेली, एवढी की चाचणी परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पंखा पडतो, तक्रारी करूनही व्यवस्थापन ढिम्म, ग्रंथालयाचीही दुरवस्था, वसतिगृहातही तेच चित्र.. या सर्व प्रकाराला

| February 8, 2014 03:08 am

वर्गाची दुरवस्था झालेली, एवढी की चाचणी परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पंखा पडतो, तक्रारी करूनही व्यवस्थापन ढिम्म, ग्रंथालयाचीही दुरवस्था, वसतिगृहातही तेच चित्र.. या सर्व प्रकाराला कंटाळलेल्या तब्बल ३६०० विद्यार्थ्यांनी शुक्रवारी कामोठय़ातील महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाविरोधात जोरदार आंदोलन पुकारत महाविद्यालय परिसरातच घोषणाबाजी केली.
एमजीएम महाविद्यालयात मंगळवारी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा सुरू होती. त्या वेळी पंखा तुटून श्वेता रहाटे या विद्यार्थिनीच्या डोक्यात पडला. त्यात श्वेतासह वैभवी व वैभव पाटील हे दोघेही जखमी झाले. यापूर्वीही अशा घटना घडल्या होत्या.
विद्यार्थ्यांनी याबाबत व्यवस्थापनाकडे वारंवार तक्रारीही केल्या होत्या, मात्र तरीही कारवाई झाली नव्हती. महाविद्यालयातीलस सोयी सुविधांबाबतही वानवा आहे.  अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचाही तुटवडा आहे.
बाहेरगावाहून येथे शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयाने सानपाडा येथे वसतिगृहाची सोय केली आहे, परंतु तिथेही सुविधांची वानवा आहे. या सर्व असुविधा असतानाही महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ९१ हजार रुपये शुल्क व प्रवेश घेतेवेळी पाच लाख रुपये देणगी आकारते.
विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रार करूनही व्यवस्थापनाने त्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे शुक्रवारी विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले. विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी सुबोध पाटील व एनएसयूआयचे रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
विद्यार्थ्यांनी प्राचार्य नारायणखेडकर यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनीही विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, परंतु विद्यार्थ्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही. अखेरीस येत्या दहा दिवसांत महाविद्यालयाच्या पायाभूत सुविधांवर तोडगा काढू, असे आश्वासन प्राचार्य नारायण खेडकर यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन आवरते घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 3:08 am

Web Title: students agitation in kamothe
Next Stories
1 पवारांच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या मिनतवाऱ्या
2 मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीचा मुद्दा उच्च न्यायालयात
3 २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Just Now!
X