News Flash

‘ब्लॉग बेन्चर्स’मध्ये विद्यार्थ्यांना सहभाग संधीचे दोन दिवस..

गुरूवारी रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना या ब्लॉगवर लेखनाद्वारे आपली प्रतिक्रिया देता येईल.

’स्पध्रेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे.

विचारांची मुद्देसूद मांडणी करणाऱ्या लेखनाची महाराष्ट्राची परंपरा जपता यावी यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’च्या या आठवडय़ातील ‘ब्लॉग’वर व्यक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांकडे आता शेवटचे दोन दिवस उरले आहे. गुरूवारी रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांना या ब्लॉगवर लेखनाद्वारे आपली प्रतिक्रिया देता येईल. त्यानंतर शुक्रवारी दुसरा ब्लॉग प्रसिद्ध केला जाणार आहे.
गेल्या आठवडय़ात शुक्रवारी ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेला प्रत्यक्ष सुरूवात झाली. पहिल्याच ब्लॉगपासून या स्पर्धेत सहभागी होण्यास राज्यभरातून विद्यार्थी उत्सुक आहे.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्याला सात हजारांचे तर दुसरा क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांला पाच हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

लक्षात ठेवावे असे..
या स्पर्धेकरिता दर आठवडय़ाला शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली एक नवीन लेख प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यावर विद्यार्थ्यांना गुरूवापर्यंत आपल्या प्रतिक्रिया नोंदविता येतील.
स्पर्धेचे स्वरूप आणि सहभागी होताना काय करायचे याचा सर्व तपशील www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावरील ‘एफएक्यू’मध्ये देण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी हा तपशील वाचून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे.
लॉग इन करताना तांत्रिक अडचणी येत असल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 5:04 am

Web Title: students get two more days for participation in loksatta blog benchers contest
Next Stories
1 प्रशासक नियुक्त बँकांचे संचालकही अपात्र
2 डॉ. बालाजी तांबे यांच्यावर गुन्हा?
3 कुंपणानेच शेत खाल्ले तर..?
Just Now!
X