News Flash

मुंबई महापालिकेच्या इंग्रजी शाळांकडेही विद्यार्थ्यांची पाठ

पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे असल्याचे कारण देत पाच वर्षांपूर्वी गाजावाजा करत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यावर भर देणाऱ्या मुंबई

| December 10, 2014 12:10 pm

पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाकडे असल्याचे कारण देत पाच वर्षांपूर्वी गाजावाजा करत इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यावर भर देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या या वाघिणीच्या दुधाकडेही विद्यार्थी पाठ फिरवीत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आतापर्यंत वाढत असलेली इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी नोंदणी कधी नव्हे ती कमी झाली आहे.
प्रजा फाऊंडेशनने पाहणी आणि माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या माहितीच्या आधारे तयार केलेल्या पालिका शाळांवरील अहवालात हे सत्य समोर आले आहे. या अहवालात पालिका शाळेतील शैक्षणिक दर्जा, पालकांचा अविश्वास, पायाभूत सुविधांचा अभाव, प्रशासन आणि नगरसेवकांची उदासीनता आदी कारणांमुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गळतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.या अहवालातील इतर इयत्तांमध्ये दर वर्षी होणाऱ्या नोंदणी पाहता पालिकेच्या इंग्रजी माध्यम शाळेतील एकूण नोंदणी १.२ टक्क्यांनी वाढलेली दिसते. पण, २००९ ते २०१४ या काळात पालिकेच्या विविध माध्यमांमध्ये इयत्ता पहिलीला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती देण्यात आली आहे. त्यात २०१२-१३पर्यंत इंग्रजी वगळता सर्वच माध्यमाच्या विद्यार्थ्यांची नोंदणी आधीच्या वर्षांच्या तुलनेत कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तोपर्यंत या शाळांमधील विद्यार्थी नोंदणी दोन ते पाच टक्क्यांनी वाढत होती. दुर्दैवाने २००९-१० मध्ये तब्बल ४०.६ टक्क्यांवर असलेली इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थी नोंदणीचे प्रमाण कमीकमी होत २०१३-१४मध्ये -९.१ टक्क्यांवर आलेले दिसते. म्हणजे आता असे चित्र आहे की, गरीब किंवा निम्नवर्गातील पालकांना जरी इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्याला शिकवायचे असले तरी त्यांना पालिका शाळेतून चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल याची खात्री वाटत नाही आहे, अशी प्रतिक्रिया प्रजाचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांनी दिली.
याचे कारण पालिकेच्या इंग्रजी शाळांमधील शिक्षक : विद्यार्थी या प्रमाणाकडे पाहिले तरी सहज दिसून येईल. इतर माध्यमाच्या शाळांमध्ये एका शिक्षकामागे २२(मराठी), ३७ (हिंदी,उर्दू), २२(कन्नड), २५(तेलगू) असे प्रमाण असताना इंग्रजी शाळांमध्ये ते ४४ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 10, 2014 12:10 pm

Web Title: students no response to mumbai municipal english medium schools
Next Stories
1 मॅक्सीनाम्याचा फतवा महिला मंडळाकडून मागे
2 ससून डॉकमध्ये नाखवा, खलाशांचे काम बंद आंदोलन मागे
3 लोकलमध्ये भजन म्हणणाऱ्या २२ जणांवर कारवाई
Just Now!
X