20 September 2020

News Flash

पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे मैदान मोकळे

अंधेरी पश्चिम महापालिकेच्या डी. एन. नगर मनपा शाळेशेजारी तब्बल ३० हजार चौरस फुटांचे खेळाचे मदान आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डी. एन. नगर येथील अतिक्रमणांवर कारवाई

अंधेरीतील डी.एन. नगर येथील महापालिका शाळेलगतच्या खेळाच्या मैदानावरील अतिक्रमणावर शुक्रवारी महापालिकेच्या वतीने हातोडा चालवण्यात आला. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी हक्काचे मैदान मोकळे झाले आहे.

अंधेरी पश्चिम महापालिकेच्या डी. एन. नगर मनपा शाळेशेजारी तब्बल ३० हजार चौरस फुटांचे खेळाचे मदान आहे. परंतु या मैदानाच्या जागेवर सुमारे ८ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम  करण्यात आले होते. मात्र या अनधिकृत बांधकामप्रकरणी महापालिकेने बजावलेल्या नोटिशीनंतर संबंधितांनी न्यायालयात धाव घेतली होती. या जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने या बांधकामांवर कारवाई करता येत नव्हती. परंतु या बांधकामांप्रकरणात उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या बाजूने निकाल दिल्यानंतर मागील तीन दिवसांपूर्वी या सर्व अनधिकृत बांधकामांवर कारवाई हाती घेण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलाच्या विशेष सहकार्याने करण्यात आलेल्या या कारवाईकरिता ४२ पोलिसांचा ताफा घटनास्थळी तैनात करण्यात आला होता. या कारवाईत महापालिकेचे ३० कामगार व कर्मचारी तसेच अधिकारी  सहभागी झाले होते. परिमंडळ ४ चे उपायुक्त  किरण आचरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेल्या या कारवाईमुळे आता या शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचे मोठे मैदान उपलब्ध होणार असल्याचे के/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त  प्रशांत गायकवाड यांनी स्पष्ट केले. तसेच या मैदानावर पुन्हा अतिक्रमण होऊ  नये यासाठी मैदानाच्या सभोवताली संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 2:38 am

Web Title: students of the school board open the ground
Next Stories
1 प्लास्टिकविरोधी कारवाईत विघ्न?
2 चर्चगेट स्थानकात सामान तपासणी यंत्रणा
3 बुडालेल्या बोटीतून बचावलेले ‘बेपत्ता’
Just Now!
X