पुण्यातील फर्गसन महाविद्यालयात कन्हैया प्रकरणावरून झालेल्या गदारोळाचा निषेध करण्यासाठी शनिवारी आंदोलनाची परवानगी मागणाऱ्या विद्यार्थ्यांना अटकाव केल्यानंतर रविवारी या विद्यार्थी संघटनांनी वरळी नाका येथे आंदोलन केले. डाव्या विचारांच्या संघटनांतील ४० ते ५० विद्यार्थ्यांनी रविवारी सायंकाळी घोषणाबाजी केली. शनिवारी माटुंगा पोलिसांनी या आंदोलकांना, आंदोलनाची परवानगी न देता त्याचा जाब विचारायला आल्यानंतर अटक केले होते.