27 May 2020

News Flash

पोषण आहाराचा शिधा विद्यार्थ्यांना वाटणार

मुलांना टप्प्या टप्प्याने बोलावून गर्दी न करता शाळांमध्ये शिधा वाटावा

संग्रहित छायाचित्र

शाळांना अचानक सुट्टी द्यावी लागल्यामुळे शाळांमध्ये साठलेला पोषण आहाराचा शिधा विद्यार्थ्यांना वाटून टाकण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून मुलांना टप्प्या टप्प्याने बोलावून गर्दी न करता शाळांमध्ये शिधा वाटावा, असे आदेश विभागाने मुख्याध्यापकांना दिले आहेत.

राज्यातील शाळा मार्चच्या दुसऱ्याच आठवडय़ात बंद कराव्या लागल्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळेनासा झाला. संचारबंदीमुळे आणि रोजगार मिळत नसल्यामुळे अनेक वस्त्या, खेडोपाडी दोन वेळच्या जेवणाचीही ददात आहे. त्याचवेळी अनेक शाळांमध्ये शिल्लक असलेला मार्च आणि एप्रिलचा शिधा सडण्याची भिती शिक्षकांनी व्यक्त केली. त्या पार्श्वभूमीवर शाळेतील कोरडा शिधा विद्यार्थ्यांना सम प्रमाणात वाटून टाकण्याचे आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले आहेत. तांदूळ, डाळ, मसाले, तेल, मीठ, जिरे, मोहरी अशा शिल्लक असलेल्या माल विद्यार्थ्यांना शाळेत बोलवून देण्यात येणार आहे. मुलांना वाटूनही काही धान्य उरत असल्यास ते परिसरातील वसतिगृहातील मुलांना देण्याच्या सूचना मुख्याध्यापकांनी दिल्या आहेत. मुख्याध्यापक, शाळा समिती, व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत वाटप करून त्याचा अहवाल द्यायचा आहे.

रोज एक वर्गातील विद्यार्थ्यांना बोलवावे. गर्दी टाळावी, विद्यार्थ्यांना अंतर ठेवून उभे करावे, वाटप झाल्यावर शिक्षकांनी लगेच घरी जावे, स्वच्छतेची काळजी घ्यावी, एखादा विद्यार्थी किंवा त्याचे पालक आजारी असल्याच त्याच्या घरी धान्य पोहोचवावे असेही मुख्याध्यापकांना दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयाच्या निकालाने जाग

आपत्तीच्या काळात विद्यार्थ्यांना पोषण आहार किंवा शिधा मिळावा याबाबत सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली होती. त्यावरील निर्णयाच्या अनुषंगाने आता विभागाला विद्यार्थ्यांना शिधा वाटप करण्याची जाग आली आहे.

वाटपाबाबत संभ्रम

असलेल्या शिध्याचे समान वाटप कसे करावे? त्याचे प्रमाण काय असावे असे प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केले आहेत. त्याचप्रमाणे शाळा दूर असलेल्या शिक्षकांनी किंवा सध्याच्या परिस्थितीत शाळेचे ठिकाण सोडून घरी गेलेल्या शिक्षकांनी संचारबंदीच्या काळात शाळेत कसे पोहोचावे अशा संभा्रमात शिक्षक आहेत.

मंत्री म्हणतात.. वाटप संचारबंदीच्या काळात नको

पोषण आहाराचे वाटप करण्याचे संचालक, उपसचिव यांचे पत्र शाळांपर्यंत शनिवारी पोहोचले. त्यानुसार शिक्षकांनी हालचालीही सुरू केल्या. मात्र, सायंकाळी शिधा वाटणे आवश्यक आहे. मात्र, त्याचे वाटप १५ एप्रिलपर्यंत नको असे शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी वक्तव्य केले. त्याची चित्रफितही शिक्षकांपर्यंत पोहोचली. त्यामुळे शिक्षकांमध्ये अधिकच संभ्रम निर्माण झाला. ‘विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचा शिधा वाटण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. परंतु संचारबंदीच्या काळात म्हणजे १४ एप्रिलपर्यंत शिधा वाटण्यात येऊ नये. एखादे अगदी गरजू कुटुंब असेल तर त्यांच्या घरी जाऊन शिधा देण्यात यावा,’ असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.  त्याचप्रमाणे मंत्री आणि विभागातील अधिकारी यांच्याच एकवाक्यता नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2020 2:15 am

Web Title: students will feel the need for nutrition abn 97
Next Stories
1 शासकीय कर्मचाऱ्यांना एसटीतून मोफत प्रवास
2 आर्थर रोड तुरुंग परिसरात विशेष निर्जतुकीकरण मोहीम
3 सॅनिटायझरचा साठा हस्तगत
Just Now!
X