दहावीचा निकाल फुगवटा आटोक्यात ठेवण्यासाठी शिक्षण मंडळाचा निर्णय; कमाल गुण २५ वरून १५वर

शालांत परीक्षा म्हणजेच दहावीला क्रीडा आणि कलेतील प्राविण्यासाठी देण्यात येणाऱ्या अतिरिक्त गुणांमुळे वाढणारा निकाल आटोक्यात ठेवण्यासाठी राज्यमंडळाने पावले उचलली असून कलेतील प्राविण्याच्या गुणांचे प्रमाण दहाने कमी करण्यात आले आहे. आता विद्यार्थ्यांना कलेतील प्राविण्यासाठी २५ ऐवजी कमाल १५ गुणच मिळू शकणार आहेत. त्याचप्रमाणे कलाकार विद्यार्थ्यांसाठी अकरावीला प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटाही रद्द करण्यात आला आहे.

शास्त्रीय नृत्य, संगीत यांच्या तीन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट ५ ते १५ गुण देण्यात येत होते. मात्र आता नृत्य किंवा संगीताच्या शासनमान्य संस्थेने घेतलेल्या परीक्षेत किती गुण मिळाले किंवा श्रेणी मिळाली त्यावर अतिरिक्त गुण अवलंबून असणार आहेत. किमान तीन ते कमाल १५ गुण विद्यार्थ्यांना मिळू शकतील. राज्य किंवा राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांन २५ गुण देण्यात येत होते. ते आता मिळू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे एका विद्यार्थ्यांला क्रीडा किंवा एकाच कलाप्रकाराचे गुण मिळू शकतील.  चित्रपटामध्ये राज्य किंवा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही आता अतिरिक्त गुण मिळू शकतील. त्याचप्रमाणे बाहेरून परीक्षा देणाऱ्या (१७ क्रमांकाचा अर्ज) विद्यार्थ्यांनाही अतिरिक्त गुणांची सवलत मिळू शकेल. अकरावीच्या प्रवेशासाठी कलेतील प्राविण्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळू शकणार नाही. अकरावीला महविद्यालयांमध्ये कलाकार विद्यार्थ्यांसाठी २ टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. त्या आता रद्द करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना आतिरिक्त गुण आणि राखीव जागा अशा दोन्ही सवलती देणे योग्य नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

बदल असा..

  • किमान पाच ते कमाल २५ गुणांऐवजी किमान तीन ते कमाल १५ गुण मिळणार.
  • राज्यस्तरीय किंवा राष्ट्रस्तरीय पारितोषिक आणि शिष्यवृत्ती मिळवणारम्य़ा विद्यर्थ्यांसाठीचे २५ गुण रद्द.
  • एकापेक्षा एकच कला प्रकार किंवा खेळ याचे अतिरिक्त गुण.
  • बाहेरून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सवलत मिळणार.
  • पाश्चात्य नृत्य प्रकारातील प्राविण्यासाठी गुणाची सवलत नाही.
  • शास्त्रीय नृत्याच्या तिसऱ्या किंवा पाचव्या परीक्षेत मिळालेल्या गुणांनुसार अतिरिक्त गुण मिळणार.
  • अकरावीच्या प्रवेशासाठी कलाकार विद्यार्थ्यांसाठीचा राखीव कोटा रद्द.

१५ डिसेंबपर्यंत मुदत

  • विद्यार्थ्यांना कलेचे अतिरिक्त गुण मिळण्यासाठीची प्रमाणपत्रे आणि अर्ज फेब्रुवारीपर्यंत जमा करता येत होते. मात्र निकालानंतरही अतिरिक्त गुणांची सवलत मिळत नसल्याच्या तक्रारी राज्यमंडळाकडे आल्या. मुळात निकालाच्यावेळी असलेल्या विद्यार्थीसंख्येत निकालानंतर वाढ झाली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अतिरिक्त गुणांची सवलत मिळण्यासाठी अर्ज येत असल्यामुळे निकाल तयार करताना राज्यमंडळाचा गोंधळ झाला. निकालाची तारीखही त्यामुळे पुढे गेली. त्यामुळे आता राज्यमंडळाने अर्ज स्विकारण्यासाठी मुदत निश्चित केली आहे. शाळांकडून १५ जानेवारीपर्यंतच अतिरिक्त गुणांसाठीचे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांनी १५ डिसेंबपर्यंत शाळेत अर्ज द्यायचे आहेत. अर्ज, संस्थेचे प्रमाणपत्र यांबरोबरच नृत्य, संगीत यांच्या परीक्षांचे गुणपत्रकही जमा करायचे आहे.

कशासाठी किती गुण मिळणार?

  • शास्त्रीय गायन, वादन, नृत्याच्या मान्यताप्राप्त संस्थेच्या किमान तीन परीक्षांमध्ये ६५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या (अ + आणि अ श्रेणी) विद्यार्थ्यांसाठी १० गुण, तर पाच परीक्षांमध्ये ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या (अ + श्रेणी) विद्यार्थ्यांसाठी १५ गुण
  • शास्त्रीय गायन, वादन, नृत्याच्या मान्यताप्राप्त संस्थेच्या किमान तीन परीक्षांमध्ये ५५ ते ६५ टक्के गुण मिळवणाऱ्या (ब+ श्रेणी) विद्यार्थ्यांसाठी ७ गुण, तर पाच परीक्षांमध्ये ५५ ते ६५ टक्के गुण मिळवणाऱ्या (अ श्रेणी) विद्यार्थ्यांसाठी  १० गुण
  • शास्त्रीय गायन, वादन, नृत्याच्या मान्यताप्राप्त संस्थेच्या किमान तीन किंवा पाच परीक्षांमध्ये ४५ ते ५५ टक्के गुण मिळवणाऱ्या (ब श्रेणी) विद्यार्थ्यांसाठी पाच गुण
  • शास्त्रीय गायन, वादन, नृत्याच्या मान्यताप्राप्त संस्थेच्या किमान तीन किंवा पाच परीक्षांमध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या (क श्रेणी) विद्यार्थ्यांसाठी तीन गुण
  • सांस्कृतिक विभागाची मान्यता असलेल्या संस्थेतून लोककलेचे किमान २५ प्रयोग करणारम्य़ांना ५ गुण, तर ५० प्रयोग करणारम्य़ांना १० गुण
  • राज्य बालनाटयम् स्पर्धेत प्रथम Rमांक मिळवणारम्य़ा विद्यार्थ्यांना १५ गुण, द्वितीय Rमांकासाठी १० गुण आणि तृतीय Rमांकासाठी ५ गुण
  • चित्रपटांत काम करणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त बालकलाकाराला १० गुण तर राज्यपुरस्कार मिळालेल्या बालकलाकाराला ५ गुण

निर्णय काय?

कला क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय गेल्यावर्षी राज्यमंडळाने अमलात आणला. शास्त्रीय संगीत, नृत्य, वाद्यवादन, अभिनय, लोककला, चित्रकला यांत प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच ते २५ अतिरिक्त गुण देण्यात आले. मात्र त्यामुळे निकाल टक्केवारी फुगली. गेल्यावर्षी तब्बल ८१ हजार ७३६ विद्यार्थ्यांनी कलेतील प्राविण्यासाठी अतिरिक्त गुण मिळवले. त्यावर मोठय़ा प्रमाणात टीकाही झाली. या पाश्र्वभूमीवर आता गुणदानाचे निकष अधिक काटेकोर करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे आता विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त १५ गुणच मिळू शकतील.