News Flash

बबन मिंडे यांच्या ‘कॉमन मॅन’ला सुभाष भेंडे पुरस्कार

दिवंगत साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भेंडे कुटंबीय आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या पहिल्या ‘सुभाष भेंडे नवोदित लेखक वाङ्मय

| February 25, 2013 02:41 am

दिवंगत साहित्यिक प्रा. डॉ. सुभाष भेंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भेंडे कुटंबीय आणि मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या पहिल्या ‘सुभाष भेंडे नवोदित लेखक वाङ्मय पुरस्कारा’साठी बबन मिंडे यांच्या ‘कॉमन मॅन’ या कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
११,१११ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. विलास खोले, नीरजा आणि अवधूत परळकर यांच्या निवड समितीने या कादंबरीची एकमताने निवड केली.
संवेदनशील सामान्य माणसाला जाणविणाऱ्या दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या अनुभवांमधील विसंगतीचे विषण्ण करणारे दर्शन या कादंबरीत प्रभावीपणे आले आहे, असे मत निवड समितीने व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:41 am

Web Title: subhash bhende award to common man of baban minde
Next Stories
1 विवेकानंद विचारांवर शिकागोत संमेलन व्हावे- अडवाणी
2 मॅरेथॉन स्पर्धेतील धावपटूचा मृत्यू
3 उपनगरीय रेल्वेसाठी हजार कोटी द्या!
Just Now!
X