‘व्हिसलिंग वूड्स’ला नाममात्र दरात साडेपाच एकर जागा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल स्कूल’साठी नियमबापणे देण्यात आलेली साडे पाच एकर जागा ताब्यात घेण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिलेला असतानाही काँग्रेसप्रमाणेच भाजप- शिवसेना युती सरकारलाही घई यांचा  पुळका आलेला आहे. विरोधी पक्षात असताना या घोटाळ्यावरून रान उठविणाऱ्यांनीच आता ही जमीन ताब्यात घेण्याऐवजी घई यांच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे. त्यानुसार नाममात्र दराने तीस वर्षांसाठी भाडेपट्टयाने ही जमीन  घई यांच्या ‘व्हिसलिंग वूड्स’ला देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात निर्माते घई यांच्या ‘व्हिसलिंग वूड्स इंटरनॅशनल स्कूल’साठी साडेपाच एकर जागा देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्र्यांना पदाचा दुरूपयोग करून नियमबाह्यपणे ही जागा देण्याचा आरोप करीत या निर्णयास न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ही  जमीन ‘व्हिसलिंग वूड्स’ किंवा चित्रपट विकास महामंडाळाला जमीन देण्यात आलेली नसून ‘मुक्ता आर्ट्स’ ला जमीन देण्याबाबतच्या या निर्णयात कायदेशीर प्रक्रियेचे पालन झालेले नसल्याचे सरकारने न्यायालयात मान्य केले होते. कॅगनेही या जमीनीच्या व्यवहारात घोटाळा झाला असून सरकारचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर सरकारचा हा निर्णय रद्द करीत जमीन परत करण्याचे आदेश न्यायालयाने घई यांना दिले होते. गेल्या चार वर्षांत ही जमीन ताब्यात घेण्याबाबत ठोस कारवाई करण्याऐवजी ती घई यांच्याच ताब्यात कशी राहील याचीच खबरदारी सरकारने घेतल्याचे आता समोर आले आहे.‘व्हिसलिंग वूड्स’ला  देण्यात आलेली ही जागा ताब्यात घेण्याऐवजी ती तब्बल ३० वर्षांसाठी तिही नाममात्र अशा रेडी रेकनरच्या दरात घई यांना देण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने घेतला असून त्याबाबतचा प्रस्तावही मान्यतेसाठी मंत्रिमंडळासोर पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subhash ghai whistling woods get plot at nominal rates
First published on: 25-09-2018 at 04:02 IST