News Flash

सुबोध भावेंची सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालकपदी निवड

दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये हे संचालक मंडळ कार्यरत असणार

subodh bhave
सुबोध भावे

आपल्या दमदार अभिनयान कौशल्याच्या बळावर छोटा पडदा, रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर मराठी रसिकांची मनं जिंकणारा कलावंत अशी ओळख असलेल्या सुबोध भावेंची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळावर निवड करण्यात आलेली आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.

गोरेगावतील दादासाहेब फाळके चित्रनगरीमध्ये हे संचालक मंडळ कार्यरत असणार आहे. संचालक समितीमध्ये पाच जणांची निवड करण्यात आली असून यामध्ये अभिनेत्री निशा परूळेकरचाही समावेश आहे. नुकतीच याची घोषणा करण्यात आली असून सुबोध भावेंचे नाव या पदासाठी निश्चित करण्यात आल्याचे माहिती आहे.

काही दिवसांपूर्वी सांगली, कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराने तेथील जनजीवन पुर्णतः विस्कळीत झाले होते. राज्यभरातून मदतीचे हात पुढे येत असताना, सुबोध भावे यांनीही कोल्हापूर आणि सांगलीकरांना मराठी नाट्य, चित्रपट आणि दूरचित्रवाणीवरील सर्व कलाकार नेहमीच तुमच्यासोबत आहोत असा विश्वास दिला होता. ”फक्त पैसे देऊन काम संपणार नाही हे माहिती आहे पण किमान सुरवात होते हे महत्त्वाचं. अस त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलेलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 9:23 pm

Web Title: subodh bhave selected as director of cultural development corporation msr 87
Next Stories
1 “पाकिस्तानला निघून जा”, मुस्लीम रिक्षाचालाकाला त्रास देणारी अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात
2 धक्कादायक! मुंबईत हॉटेल रुममध्ये ड्रायव्हरने विवाहितेवर केला बलात्कार
3 मुंबई : गटाराची झाकणं चोरणाऱ्या दोघांना अटक
Just Now!
X