News Flash

उपनगरीय रेल्वे प्रवासाची सर्वसामान्यांनाही मुभा

सबळ कारण आवश्यक, राज्य सरकारचे नवे नियम

(संग्रहित छायाचित्र)

करोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या काळात उपनगरीय रेल्वेसेवेचा सर्वसामान्य नागरिक वापर करू शकतात, पण त्यासाठी वैध कारण द्यावे लागेल, असे राज्य सरकारने स्पष्ट के ले आहे. याशिवाय सकाळी फिरणे, सायकल चालविण्यास बंदी असेल. ई-कॉमर्समध्ये किराणा, औषधे, अन्नपदार्थ इत्यादी अत्यावश्यक सेवेतील वस्तूंच्या वितरणासही परवानगी देण्यात आली आहे.

राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या काळात कशाचा वापर करता येईल, काय सुरू असेल आणि कोणते व्यवहार बंद असतील याची सविस्तर माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार उपनगरीय रेल्वेसेवा सुरू राहील. खासगी वाहने सबळ कारणांशिवाय रस्त्यावर आणता येणार नाहीत. पण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून (रेल्वे, बसेस) प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून कोणालाही कु ठेही ये-जा करणे शक्य होईल. अर्थात, बस गाड्यांमधून उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसन क्षमतेएवढ्याच प्रवाशांना बसमध्ये प्रवेश दिला जाईल.

हे बंदच…

* सकाळी फिरायला जाणे, धावणे, सायकल चालविणे.

* कपड्यांची दुकाने, पुस्तकांची दुकाने, मद्याची दुकाने आणि सिगारेट दुकाने.

* साहित्याची ऑर्डर ऑनलाइन किंवा दूरध्वनीवरून देता येईल, मात्र बांधकाम साहित्याचे दुकान उघडे ठेवता येणार नाही.

* प्राणी तसेच लोकांसाठी मदतीचे काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना स्थानिक प्रशासनाच्या मान्यतेशिवाय काम सुरू ठेवता येणार नाही.

* ‘मूव्हर्स एन्ड पॅकर्स’ सेवा पुरवठादारांच्या मदतीने अपवादात्मक परिस्थितीत स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने घरातील साहित्य, वस्तू अन्यत्र हलवता येईल. मात्र सर्वसाधारणपणे साहित्य हलविण्यास परवानगी नाही.

राज्यात ६१,६९५ नवे रुग्ण

मुंबई  :  राज्यात गेल्या २४ तासात ६१,६९५ नव्या करोना रुग्णांचे निदान झाले असून, ३४९ जणांचा मृत्यू झाला. पुणे, विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ आता उत्तर महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढली आहे.

दिवसभरात मुंबई ८२०९, नाशिक शहर ३२३५, उर्वरित नाशिक जिल्हा १५९२, नगर जिल्हा २९७७, जळगाव जिल्हा ८५९, पुणे शहर ५४६९, पिंपरी-चिंचवड २०३७, उर्वरित पुणे जिल्हा २४५५, सातारा ११५३, औरंगाबादग जिल्हा १३४८, जालना ७३५, लातूर जिल्हा १२४५, नांदेड जिल्हा १२४४, नागपूर शहर ४८९९, उर्वरित नागपूर जिल्हा २१७६, भंडारा १२५२, चंद्रपूर १५३१ नवे रुग्ण आढळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2021 12:36 am

Web Title: suburban rail travel to the general public abn 97
Next Stories
1 रेमडेसिविरसाठी जीवघेणी धावपळ अनाठायी…
2 खासगी रुग्णालयातून पंचतारांकित हॉटेलात
3 प्राणवायू आणि रेमडेसिविरचे व्यवस्थापन करा!
Just Now!
X