News Flash

कोरेगाव-भीमा प्रकरण : कोण आहे अटक झालेले सुधीर ढवळे आणि सुरेंद्र गडलिंग?

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आज पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात आज पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी तीन जणांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विश्रामबाग पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक आणि दलित लेखक सुधीर धवळे यांना त्यांच्या गोवंडी येथील घरातून ताब्यात घेतले. तर वकील सुरेंद्र गडलिंग यांना नागपुरातून आणि माओवाद्यांचे नेते रोना विल्सन यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

शनिवारवाड्याजवळ कबीर कला मंच व रिपब्लिकन पँथरने ३१ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित एल्गार परिषदेत करण्यात आलेली चिथावणीखोर भाषणे व गाण्यांमुळे भीमा-कोरेगाव दंगल भडकल्याचा आरोप होता. या आयोजनामागे नक्षल्यांचा काही संबंध आहे का, याची चाचपणी पोलिस करत आहेत. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी कबीर कला मंच आणि रिपब्लिकन पँथर कार्यकर्त्यांच्या घरीही छापे टाकण्यात आले होते. पुणे पोलिसांनी पुण्यासह मुंबई आणि नागपुरातही छापासत्र राबवले होते. पुणे पोलिसांच्या पथकाने नागपुरातील जरीपटका पोलिसांच्या मदतीने अॅड. सुरेंद्र गडलिंग यांच्या बुद्धनगरातील निवासस्थानावर छापा टाकला होता.

कोण आहेत सुधीर ढवळे –
6 डिसेंबर 2007 रोजी स्थापन झालेल्या रिपब्लिकन पँथरचे सुधीर ढवळे हे संस्थापक सदस्य आहेत. विद्रोही चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आणि दलित लेखक अशीही सुधीर ढवळेंची ओळख आहे. सुधीर ढवळे हे दलित चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते असून, शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब (प्रिव्हेन्शन ऑफ अॅट्रॉसिटीज) अॅक्टच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी अनेकदा अभियान राबवले आहे. एल्गार परिषदेमध्ये काही नक्षलवादी सहभागी झाले होते आणि हे नक्षलवादी सुधीर ढवळे यांच्या संपर्कात आहेत असा आरोप करण्यात येत होता. तसंच, भीमा कोरेगाव दंगलीपूर्वी भडकाऊ भाषणे आणि पुस्तके वाटप केल्याचा आरोप सुधीर ढवळेंवर होता.

कोण आहेत अॅड. सुरेंद्र गडलिंग?
नक्षलवाद्यांचे खटले लढणारे वकील म्हणून अॅड. सुरेंद्र गडलिंग यांची ओळख आहे. दिल्ली विद्यापीठाचा प्रा. साईबाबासह अनेक नक्षलवादी समर्थक अथवा नेत्यांचे खटले अॅड. गडलिंग यांनीच लढवले आहेत. त्यामुळे ते कायम पोलिस यंत्रणेच्या रडारवर राहिलेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 8:43 am

Web Title: sudhir dhawle and adv surendra gadaling arrested by pune police in koregaon bhima violence
Next Stories
1 ‘त्या’ वाघिणीला ठार करण्यास न्यायालयाची परवानगी
2 दिवाळीत भारनियमन नाही, ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन
3 नेहमी हिंदू सणांना विरोध का, हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल
Just Now!
X