शिवसेनेने जरी स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा केली असली तरी भाजप-शिवसेना युती व्हावी हे दोन्ही पक्षांतील अनेकांची इच्छा आहे.  त्याचबरोबर कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युती झालीच पाहिजे अशी राज्यातील मतदारांची भावना आहे, प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

शिवसेनेने स्वबळावर निवडणुका लढण्याची केलेली घोषणा व त्याचवेळी राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडीसाठी सुरू झालेले प्रय या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वेळोवेळी युती होण्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. सध्या केंद्र सरकारविरोधात अविश्वस ठराव आल्यावर शिवसेनेने केंद्र सरकारविरोधात मतदान करायचे नाही, असे ठरवल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना युती झाली पाहिजे या भूमिकेचा पुनरुच्चार केला.