अर्थसंकल्प सादर झाल्यावर आमदारांना लगेचच देण्यात येणाऱ्या कागदपत्रांच्या बँगांमध्येच वित्तमंत्र्यांच्या भाषणांच्या प्रती दिल्या जातात, पण शुक्रवारी अर्थसंकल्प सादर झाल्यावर देण्यात आलेल्या बँगांमध्ये वित्तमंत्र्यांच्या भाषणाच्या प्रती नव्हत्या. छपाईस विलंब झाल्यानेच पुस्तिका मिळण्यास उशिर झाल्याचे समजते.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे रात्री उशिरापर्यंत अर्थसंकल्पाची तयारी करीत होते. काही प्रस्ताव रात्री उशिरा बदलण्यात आले. एरव्ही अर्थमंत्र्यांच्या भाषणाची प्रत मध्यरात्री छपाईस शासकीय छापखान्यात जाते. यंदा हे भाषण सकाळी छपाईकरिता गेले. यातूनच आमदारांच्या बँगांमध्ये या प्रती टाकणे शक्य झाले नाही, असे समजते.