चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. विशेष म्हणजे या जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय झाला नसता, तर आपण आजच मंत्रिपदाचा राजीनामा देणार होतो, असा खुलासा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. दारूबंदीचा निर्णय झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय झाल्यानंतर आता त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अंमलबजावणीसाठी नियमांमध्ये आवश्यक बदल करणार असल्याचेही त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.