राज्यात साखरेचे दर जोपर्यंत वाढत नाही, तोपर्यंत उसाला भाव देता येणार नसल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे उसाच्या दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.
उसाच्या दराबाबत २४ नोव्हेंबरपूर्वी ठोस निर्णय न घेतल्यास सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. त्यामुळे हे आंदोलन येत्या दोन दिवसात उग्र होण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, “सध्या बाजारात साखरेचे दर पडले असल्याने उसाला किती दर द्यायचा याबाबत बैठक घेण्यात येईल व त्याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच उसाला एफआरपी प्रमाणे दर देता येतील का? या बाबतही विचार सुरू आहेत.”