News Flash

बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वाघ यांना २०१८ मध्ये वाळूउपसा व वाहतुकीचा परवाना मिळाला होता.

संग्रहीत

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अल्टामाऊंट रोड येथील रॉयल स्टोन निवासस्थानी नगरच्या पांडुरंग वाघ या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न के ला. मात्र  पोलिसांनी त्यांना वेळीच  ताब्यात घेतले. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

वाघ यांना २०१८ मध्ये वाळूउपसा व वाहतुकीचा परवाना मिळाला होता. त्यासाठी त्यांनी आठ लाख ७२ हजार रुपये भरले होते. मात्र वाळूउपसा करण्यास स्थानिकांनी विरोध केला. त्यामुळे त्यांना वाळू काढणे शक्य झाले नाही. परवान्यासाठी भरलेली रक्कम परत मिळावी या मागणीसाठी ते बुधवारी महसूलमंत्र्यांच्या निवासस्थानी आले. तेथे त्यांनी पेट्रोल अंगावर ओतून  पेटवून घेण्याचा प्रयत्न के ला. मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच रोखले.  वाघ हे नगरच्या नेवासा येथील झापडी गावचे रहिवासी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 1:05 am

Web Title: suicide attempt of a youth at the residence of balasaheb thorat abn 97
Next Stories
1 मुंबईत अंशत: टाळेबंदीचे महापौरांकडून संकेत
2 कल्याण-कसारा भागांत ‘ट्रॅफिक ब्लॉक’
3 दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नसंच
Just Now!
X