मुंबई : बनावट चाहते प्रकरणात ‘क्यूकी डॉट कॉम’ या ‘सोशल मीडिया मार्केटिंग’ कं पनीचे प्रमुख (चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) सागर गोखले यांना गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने चौकशीसाठी बोलावले आहे. गोखले यांची बुधवारी चौकशी होऊ शके ल. गायक आदित्य प्रतीकसिंह सिसोदिया ऊर्फ  बादशाह याच्या चौकशीतून या कंपनीचे नाव पुढे आले.

प्रभारी पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या विशेष पथकाने गेल्या आठवडय़ात बादशाहकडे दोन दिवस चौकशी के ली होती. बादशाहने अलीकडेच ‘लडकी पागल है..’ हे गाणे यूटय़ूबवर अपलोड के ले. २४ तासांच्या आत हे गाणे साडेसात कोटी व्यक्तींनी पाहिले. याची जागतिक विक्र म म्हणून नोंद व्हावी, अशी त्याची इच्छा होती. अचानक इतक्या मोठय़ा संख्येने प्रतिसाद मिळाल्याने विशेष पथकाचे लक्ष बादशाहकडे गेले. चौकशीत सात कोटींहून जास्त ‘व्ह्य़ूव्हज’ विकत घेतल्याचे त्याने कबूल के ले. त्यासाठी त्याने एका कं पनीला ७२ लाख रुपये अदा के ले होते. त्याने के लेल्या या आर्थिक व्यवहाराचे पुरावे विशेष पथकाला मिळाले आहेत.

बादशाहने क्यूकी डॉट कॉमला ही रक्कम दिली आणि याच कंपनीने त्याच्या समाजमाध्यम खात्यांवरील चाहते आणि चाहत्यांचा प्रतिसाद वाढविल्याचा संशय विशेष पथकाला आहे. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार बादशाह आणि सोशल मीडिया मार्केटिंग कं पनीतील आर्थिक व्यवहार उघड झाले आहेत. त्याबाबत अधिक  तपास सुरू आहे. प्रसिद्ध संगीतकार ए आर रेहमान आणि दिग्दर्शक शेखर कपूर क्यूकी डॉट कॉमचे सहसंस्थापक आहेत. तशी माहिती या संके तस्थळावर उपलब्ध आहे.