News Flash

सलमान खानच्या कुटुंबियांना समन्स बजावणार

अभिनेता सलमान खानने मच्छिमारांना धमकविल्याप्रकरणी अखेर वांद्रे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी आता सलमान खान, त्याचे वडील सलीम खान आणि अंगरक्षकांना चौकशीसाठी

| March 14, 2013 05:45 am

अभिनेता सलमान खानने मच्छिमारांना धमकविल्याप्रकरणी अखेर वांद्रे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी आता सलमान खान, त्याचे वडील सलीम खान आणि अंगरक्षकांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात येणार आहे. बुधवारी पोलिसांनी या प्रकरणातील फिर्यादी मच्छिमार लॉरेन्स फाल्कन (६५) यांच्या कुटुंबियांचे जबाब नोंदविले.
वांद्रे समुद्रकिनाऱ्यावर सलमान खान कुटुंबियांनी ‘बेल व्ह्यू’ आणि ‘बेनार’ हे दोन बंगले विकत घेतले होते. येथील स्थानिक मच्छिमार लॉरेन्स फाल्कन यांच्या बोटी तसेच मच्छिमारीच्या जाळ्या या बंगल्यासमोर येत असल्याने सलमनाला समुद्राचे दृश्य बघण्यास अडथळा येत होता. त्यामुळे सलमान खान, सलीम खान आणि त्यांच्या ५ अंगरक्षकांनी फाल्कन कुटुंबियांना धमकावत छळ सुरू केला होता. वांद्रे पोलिसांमध्ये सप्टेंबर २०११ पासून तीन वेळा तक्रार दाखल करूनही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. त्यामुळे फाल्कन कुटुंबियांनी नुकतीच स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेतली होती. त्यांनी याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्तांना आदेश दिले होते. त्यामुळे वांद्रे पोलिसांनी बुधवारी फाल्कन कुटुंबियांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. याप्रकरणात खान कुटुंबियांनी चौकशीसाठी हजर रहावे यासाठी त्यांना समन्स बजावण्यात येणार असल्याचे वांद्रे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 5:45 am

Web Title: summons will be send to family of salman khan
टॅग : Salman Khan
Next Stories
1 सुनील तटकरे यांच्यावर हक्कभंग
2 मालवाहतूकदारांचा १ एप्रिलपासून बेमुदत संपाचा इशारा
3 राष्ट्रवादीचे अनधिकृत कार्यालय जमीनदोस्त
Just Now!
X