पश्‍चिम रेल्वेच्या माहीम जंक्शन-मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान रविवारी मध्यरात्री ४ तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक मध्यरात्री १२ ते पहाटे ४ या कालावधीत असेल. हा ब्लॉक अप धीम्या तर डाऊन जलद गती अशा दोन्ही मार्गांवर असेल. या कालावधीत वरील स्थानकांदरम्यान माटुंगा रोड, एल्फिन्स्टन रोड, लोअर परेल आणि महालक्ष्मी या स्थानकांत फलाटांच्या अभावामुळे थांबणार नाहीत. १२ डब्यांच्या सर्व गाड्या माहीम स्थानकात दोन वेळा थांबतील. तसेच प्रवाशांना वरील स्थानकात जायचे असेल तर त्यांना आहे त्या तिकीट/पासावर मुंबई सेंट्रल-बांद्रे स्थानकांदरम्यान विरुद्ध दिशेने प्रवासाची मुभा असल्याची प.रे.च्या प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जनसंपर्क विभागाने केले आहे.