रेल्वेमार्गाची दुरुस्ती, ओव्हरहेड वायरची देखभाल आणि इतर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी मध्य तसेच हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मध्य तसेच हार्बर मार्गावरील गाडय़ा वेळापत्रकापेक्षा १५-२० मिनिटे उशिराने धावणार आहेत. या रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याने पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सुरळीत असेल. तसेच येथे होणाऱ्या रात्रकालीन ब्लॉकचा परिणाम वाहतुकीवर होणार नाही.

मध्य रेल्वे
कुठे – मुलुंड ते माटुंगा
अप धीम्या मार्गावर
कधी – सकाळी ११.१५ ते
दुपारी ३.१५ वाजता
परिणाम – ब्लॉकदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या सर्व धीम्या गाडय़ा मुलुंड ते माटुंगा या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाडय़ा भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव या स्थानकांवरच थांबतील. माटुंग्यापुढे या गाडय़ा पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार या स्थानकांवरील प्रवाशांना अनुक्रमे मुलुंड-भांडुप, भांडुप-विक्रोळी आणि कुर्ला-घाटकोपर या स्थानकांवर जाऊन प्रवास करता येईल.
कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाडय़ा त्यांच्या नेहमीच्या थांब्यांशिवाय घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड आणि भांडुप या स्थानकांवरही थांबतील. तर मुंबईकडे जाणाऱ्या जलद गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांवरही थांबतील.

हार्बर मार्ग
कुठे – कुर्ला ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर
कधी – सकाळी ११.०० ते
दुपारी ३.०० वा.
परिणाम – ब्लॉकदरम्यान पनवेल ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यादरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. त्याऐवजी छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी यादरम्यान विशेष गाडय़ा चालवल्या जातील. तसेच हार्बर मार्गावरील प्रवाशांना वैध तिकिटाच्या आधारावर मुख्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करता येणार आहे.