*कुठे- ठाणे-कल्याण डाऊन धीमा.
*कधी – स. १०.३० ते दुपारी ३.३०
*परिणाम- डाऊन धीम्या आणि अर्ध जलद गाडय़ांची वाहतूक मुलुंडपासून कल्याणपर्यंत डाऊन जलद मार्गावर वळविणार. या वेळेत गाडय़ा फक्त ठाणे व डोंबिवली स्थानकांवरच थांबणार.  छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून सुटणाऱ्या डाऊन जलद गाडय़ा १०.०८ ते दु. २.४० या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या स्थानकांवर थांबणार आहेत. तर स. १०.५० ते दु. ३.३६ या वेळेत ठाण्यापासून अप जलद मार्गावरील गाडय़ा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबणार.
*कुठे – नेरुळ ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर
*कधी – सकाळी ११ ते दुपारी ३
*परिणाम- सीएसटी ते पनवेल वाहतूक स. १०.१२ ते दु. २.४५ आणि पनवेल ते सीएसटी वाहतूक स. १०.२० ते दु. ३.०४ या वेळेत पूर्णपणे बंद. या कालावधीत सीएसटी ते मानखुर्द आणि ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर लिंक मार्गावर विशेष गाडय़ा सोडणार. हार्बर प्रवाशांना ट्रान्स हार्बरने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.
 *कुठे- गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्ग.
*कधी- सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५
*परिणाम- या कालावधीत गोरेगाव ते बोरिवली अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व गाडय़ा धीम्या मार्गावर चालविणार. या मार्गावरील काही गाडय़ा रद्द. या कालावधीत सगळ्या बोरिवली लोकलचा प्रवास बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक ७, ८ आणि २ येथे संपविण्यात येणार.