14 November 2019

News Flash

रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक

कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक

विविध तांत्रिक कामांसाठी आज  रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव दोन्ही जलद मार्गावर ब्लॉक होईल. त्यामुळे या मार्गावरील उपनगरी रेल्वे फे ऱ्या पंधरा मिनिटे उशिराने धावतील. तर मेल-एक्स्प्रेसही उशिराने धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

मध्य रेल्वे-मुख्य मार्ग

कुठे – कल्याण ते ठाणे अप जलद मार्ग

कधी – स.११.३० ते दु. ४.००

परिणाम – सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल गाडय़ा दिवा ते परळ स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील. परळनंतर पुन्हा जलद मार्गावर धावतील. सीएसएमटीतून सुटणाऱ्या जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकात थांबतील. रत्नागिरी ते दादर पॅसेंजर गाडी दिवा स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. तर ही गाडी दिवा स्थानकातूनच रत्नागिरीसाठी सुटेल.

हार्बर मार्ग

कुठे – पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर

कधी – स.११.३० ते दु. ४ वा

परिणाम – ब्लॉकमुळे सकाळी ११.०६ ते दुपारी ४ पर्यंत पनवेल ते सीएसएमटी आणि सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ पर्यंत सीएसएमटी ते पनवेल, बेलापूरला जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवल्या जातील. सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ पर्यंत पनवेल ते वाशी दरम्यानच्या अप-डाऊन फेऱ्याही रद्द राहतील. तर सकाळी ११.१४ पासून ते दुपारी ३.२० पर्यंत पनवेल ते ठाणे  ट्रान्स हार्बरवरील फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी पावणे बारापासून ते दुपारी पावणे तीनपर्यंत नेरुळ ते खारकोपर आणि दुपारी १२.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंतच्या खारकोपर ते नेरुळदरम्यानच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. बेलापूर ते खारकोपर आणि ठाणे ते वाशी, नेरुळपर्यंतच्या लोकल फेऱ्या नियमितपणे धावतील.

पश्चिम रेल्वे

कुठे – सांताक्रुझ ते गोरेगाव दोन्ही जलद मार्ग

कधी – स.१०.३५ ते दु.३.३५ वा

परिणाम – जलद मार्गावर असलेल्या ब्लॉकमुळे या मार्गावरील लोकल सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

First Published on November 9, 2019 2:21 am

Web Title: sunday railway mega block akp 94