आघाडीचे चार नगरसेवक गैरहजर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला शब्द पाळून आपली सर्व सहा मते आघाडीच्या पारडय़ात टाकूनही चार स्वपक्षीयांनीच दगा दिल्याने अखेर आज झालेल्या अटीतटीच्या लढतीत अंबरनाथच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेचे सुनील चौधरी यांची फेरनिवड झाली. उपनगराध्यक्षपदासाठी आघाडीचे प्रदीप पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याने युतीचे रमेश गुंजाळ निवडले गेले.    
ठाणे महापालिकेतील सत्तास्थान डळमळीत झाल्यानंतर जिल्ह्य़ातील इतर सत्ताकेंद्रे आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सेना नेतृत्वाने आपली सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती. सहा महिन्यांपूर्वी विषय समिती सभापती निवडणुकीत मनसेने बाहेरून दिलेला पाठिंबा काढल्याने अल्पमतात आलेल्या सेनेने साम-दाम-दंड-भेद नीती वापरून नगराध्यक्षपदाची विजयश्री खेचून आणली.
शिवसेना शहर अध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्यावर गेल्या नोव्हेंबर महिन्यात प्राणघातक हल्ल्याप्रकरणी आरोपी म्हणून अटकेत असणारा नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे यानेही पोलीस बंदोबस्तात येऊन मतदानाचा हक्क बजावला. पालिकेच्या सभागृहात तहसीलदार बाळासाहेब खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्ष तसेच उपनगराध्यक्षपद निवडण्यासाठी विशेष सभा पार पडली. नगराध्यक्षपदासाठी सुनील चौधरी यांना २४ तर त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीचे सदाशिव पाटील यांना २२ मते मिळाली. या निवडणुकीत आघाडीतील रिपाइंचे मनोज देवडे, रजनी तांबे, रविंद्र करंजुले आणि राष्ट्रवादीचे रवींद्र करंजुले गैरहजर राहिले.     
बदलापूरच्या अध्यक्षपदी जयश्री भोईर
ठाणे  बदलापूर पालिकेच्या नगराध्यक्षपदी शिवसेना-भाजप-मनसे-काँग्रेस महाआघाडीच्या जयश्री भोईर तर उपनगराध्यक्षपदासाठी वृषाली मेने यांची  नावे निवडणूक निर्णय अधिकारी कल्याणचे तहसीलदार शेखर घाडगे यांनी जाहीर केली. दहा महिन्यांपूर्वी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री भोईर यांनी सेनेला मदत केली होती. त्यांना नगराध्यक्षपद देऊन सेनेने त्यांच्या उपकाराची परतफेड केल्याचे मानले जात आहे. आज झालेल्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक आशीष दामले तसेच राष्ट्रवादीचे सर्व दहा सदस्य गैरहजर राहिले.

Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Uddhav Thackeray Gave Answer to Narendra Modi
उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींच्या ‘नकली शिवसेने’च्या टीकेवर जोरदार उत्तर, “तुमच्या बरोबर जो चायनीज माल..”
Bhiwandi lok sabha
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडाचे वारे ? काँग्रेस लढण्यावर ठाम
Mallikarjun Kharge and narendra modi
मोदींनी झोपेच्या गोळ्या घेतल्यात का? चीनच्या घुसखोरीवर बोलताना मल्लिकार्जुन खरगेंची टीका