News Flash

रशियन भाषादूत, लेखिका डॉ. सुनीती देशपांडे यांचे निधन

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते

मुंबईतील रशियन वकिलातीच्या सांस्कृतिक विभागाच्या रशियन भाषा संस्थेच्या प्रमुख व ज्येष्ठ व्याख्यात्या आणि लेखिका डॉ. सुनीती देशपांडे यांचे बुधवारी मुंबईत विक्रोळी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ६१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन भाऊ असा परिवार आहे. अनुवादक आणि रशियन भाषा तज्ज्ञ अशीही त्यांची ओळख होती.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर ‘मल्टी ऑर्गन फेल्युअर’मुळे त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले. मूळच्या कोल्हापूरच्या असणाऱ्या डॉ. सुनीती देशपांडे यांनी रशियन व इंग्रजी भाषेत ‘एमए’ तर रशियन भाषेत ‘पीएचडी’ पदवी प्राप्त केली होती. रशियन भाषा कशी शिकावी याबाबत त्यांनी लिहिलेले आणि रशियन भाषा संस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक अनेक शाळा व महाविद्यालयांनी अभ्यासक्रमात समाविष्ट केले होते. डॉ. देशपांडे यांनी रशियातील अनेक लोकप्रिय लेखकांच्या रशियन कथांचा मराठीत अनुवाद केला होता. त्यांनी लिहिलेले १०० हून अधिक लेख आणि शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. ‘आनंदभेट’, ‘अंतरपर्व’, ‘कथांतर’, ‘सदाफुली’, ‘फुलांचे बोल’ ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘मॉस्को ८५० स्पर्धा’, रशियन साहित्याच्या केलेल्या सेवेबद्दलचे जीवनगौरव, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ द प्रोफेसर्स ऑफ द रशियन लँग्वेज अ‍ॅण्ड लिटरेचर आदी पुरस्कार तसेच रशियन भाषेच्या मानद तज्ज्ञ, नॅशनल ‘यूजीसी’ आदी शिष्यवृत्तीही त्यांना मिळाल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2015 5:45 am

Web Title: suniti deshpande no more
Next Stories
1 डोंबिवली स्थानक सर्वाधिक गर्दीचे , गजबजलेल्या स्थानकांच्या यादीत ठाणे दुसऱ्या क्रमांकावर
2 ‘महानंद’ची चौकशी करण्याचे आदेश
3 नवी मुंबईतील ९४ इमारती पाडणार! दिघा गावातील बेकायदा इमारतींवर कारवाईचे आदेश
Just Now!
X