News Flash

आठ डान्सबारना २ दिवसांत परवाने द्या, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे

राज्य सरकारने सुरुवातीला २६ अटी आणि त्यानंतर नवा कायदा आणल्यामुळे राज्यात डान्सबार सुरू होणे कठीण असल्याचेच दिसून येत होते.

येत्या दोन दिवसांत मुंबईतील ८ डान्सबारना तातडीने परवाने देण्यात यावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कडक अटी घालून डान्सबारवर निर्बंध लादू पाहणाऱ्या राज्य सरकारला तातडीने परवाने द्यावेच लागणार आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
डान्स बारला परवानगी देताना ते सुरूच राहू नयेत, अशा प्रकारे कठोर निर्बंध लादण्याची तरतूद असलेले विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने सुरुवातीला २६ अटी आणि त्यानंतर नवा कायदा आणल्यामुळे राज्यात डान्सबार सुरू होणे कठीण असल्याचेच दिसून येत होते. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने दोन दिवसांत ८ डान्सबारना आवश्यक परवाने देण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2016 3:18 pm

Web Title: supreme court directs maharashtra govt to give license to 8 dance bars within 2 days
टॅग : Dance Bar
Next Stories
1 काळबादेवी अद्याप आगीचे ‘गोकुळ’
2 बालकामगारांची नेपाळमधून तस्करी
3 आठवडय़ाची मुलाखत : गिरणी कामगारांना ‘अच्छे दिन’ नाहीच!
Just Now!
X