News Flash

मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आजपासून सुनावणी

. मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि आरक्षण समर्थकांतर्फे १२,१५,१६ आणि १७ मार्च रोजी युक्तिवाद होतील.

मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारपासून महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू होणार आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या त्रिसदस्यीय पीठाने मराठा आरक्षणास स्थगिती देऊन हे प्रकरण पाच सदस्यीय पीठाकडे सोपविले होते. या  पीठाने ५ फेब्रुवारीला सुनावणीचे वेळापत्रक ठरविले होते. त्यानुसार ८ ते १० मार्च या तीन दिवसांमध्ये विरोधक बाजू मांडतील. मुख्यमंत्री, मुख्य सचिव आणि आरक्षण समर्थकांतर्फे १२,१५,१६ आणि १७ मार्च रोजी युक्तिवाद होतील. तर १८ मार्चला केंद्र सरकार बाजू मांडणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 12:29 am

Web Title: supreme court hearing on maratha reservation from today abn 97
Next Stories
1 राज्यात आठवडय़ाभरात ५० हजार करोनाबाधित
2 ‘लोकसत्ता – अर्थब्रह्म’ वार्षिकांकाच्या प्रकाशनानिमित्त गुंतवणूकदारांशी संवाद
3 गर्दी नियंत्रणासाठी कठोर निर्बंध?
Just Now!
X