12 August 2020

News Flash

मराठा आरक्षणावर ७ जुलैला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू

संग्रहित छायाचित्र

मराठा आरक्षण व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या संदर्भातील याचिकांवर येत्या मंगळवारी ७ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकोंवर राज्य सरकारची बाजू भक्कमपणे मांडण्याची पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री व मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गासाठी (मराठा समाज) शिक्षण व शासकीय सेवेत आरक्षण लागू करण्याकरिता विधिमंडळाने विधेयक संमत केले. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकावा, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे चव्हाण यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या पाठपुराव्यासाठी  उपसमितीची  वरिष्ठ विधिज्ञांसमवेत बैठक झाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 12:26 am

Web Title: supreme court hearing on maratha reservation on july 7 abn 97
Next Stories
1 सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवरुन उसळलेल्या वादावर राज ठाकरे म्हणतात..
2 ‘अनलॉक’च्या प्रक्रियेत सायबर सुरक्षेचा धोका कायम; ‘एगॉन’ने जाहीर केली मार्गदर्शक तत्वे
3 उबरने बंद केलं मुंबईतलं ऑफिस, मात्र कंपनी ग्राहकांना म्हणतेय…
Just Now!
X