News Flash

सुप्रिया सुळे ‘यालाच’ आणीबाणी म्हणतात – केशव उपाध्ये

तेही राष्ट्रवादीचा गृहमंत्री असलेल्या राज्यात घडतंय, असं देखील म्हणाले आहेत.

संग्रहीत

रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. यावरून आता भाजपा व राज्य सरकारमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाल्याचे दिसत आहे. भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील त्यांनाी निशाणा साधला आहे.

”विरोधात टीका करणाऱ्या चॅनेल्सवर अशी घरात घुसून कारवाई. विरोधी विचार दडपून टाकायचा हा प्रयत्न, सुप्रिया सुळे यालाच आणिबाणी म्हणतात तेही राष्ट्रवादीचा गृहमंत्री असलेल्या राज्यात घडतंय.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. याचबरोबर त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटेकचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

आणखी वाचा- रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक

आणखी वाचा- अर्णब गोस्वामी अटक : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं आहे तरी काय, जाणून घ्या

मोदी सरकार हळूहळू देशात आणीबाणी आणू पाहतं आहे असं चित्र आहे, असं म्हणत कांजूर कारशेडच्या जागेवरुन सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती त्यांच्या या वक्तव्यावरून आता केशव उपाध्ये यांनी निशाणा साधला आहे.

आणखी वाचा- हे तर आणीबाणी सारखं, माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील हल्ल्याचा निषेध – जावडेकर

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेवर केंद्र सरकारने केलेला दावा धक्कादायक आहे असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलं होतं. कांजूरमार्ग येथील कारशेडसाठीची जमीन ही महाराष्ट्र सरकारची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची जमीन असते त्याच राज्याचा त्या जमिनीवर पहिला अधिकार असतो. केंद्र सरकार सातत्याने राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचं काम करतंय असंही सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 10:40 am

Web Title: supriya sule calls this an emergency keshav upadhye msr 87
Next Stories
1 “आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण…,” अर्णब गोस्वामी अटकेवरुन फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2 अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
3 “काँग्रेसच्या सहवासात ठाकरे सरकार…”; अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून आशिष शेलारांची टीका
Just Now!
X