जेव्हा कोणतंही संकट येतं तेव्हा कुटुंबीयच पाठिशी उभे राहतात असं म्हणत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. राज ठाकरे हे जेव्हा ईडीच्या कार्यालयात हजर झाले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयही होते. यावरुन अंजली दमानिया यांनी एक खोचक प्रश्न विचारला की राज ठाकरे ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? ज्यावर आता राज ठाकरेंना पाठिंबा देत सुप्रिया सुळे यांनी दमानियांना उत्तर दिलं आहे.

ईडीची चौकशी म्हणजे राजकीय दबावतंत्र आहे. जो कोणीही सरकारविरोधात आवाज उठवतो त्याचा आवाज दडपण्यासाठी हे दबावतंत्र वापरलं जातं आहे. अशा संकटांच्यावेळी आपले कुटुंबीय आपल्या पाठिशी उभे राहतात. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासोबत कुटुंबीय का गेले? असा प्रश्न कोणीही उपस्थित करण्याची गरज नाही असे म्हणत अंजली दमानिया यांचे नाव न घेता सुप्रिया सुळेंनी त्यांना उत्तर दिलं आहे.

राज ठाकरे ईडीच्या चौकशीसाठी कार्यालयात हजर होण्यासाठी निघाले तेव्हा राज ठाकरे सहकुटुंब ईडीच्या चौकशीला निघाले आहेत की सत्यनारायणाच्या पूजेला? बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहिण सगळे मिळून माहिती देणार का? हा ड्रामा आहे की सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न? असे प्रश्न ट्विट करत अंजली दमानिया यांनी राज ठाकरेंवर टीका केली. मात्र सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंची बाजू घेत अडचणीच्या वेळी कुटुंबीयच पाठिशी उभे राहतात असे म्हणत अंजली दमानियांना उत्तर दिले आहे.