18 September 2020

News Flash

पंतप्रधान-सुप्रिया सुळे भेट

भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच गेल्या आठवडय़ात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यावर ..

| March 3, 2015 03:18 am

भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत असतानाच गेल्या आठवडय़ात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतल्यावर सोमवारी पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
अवकाळी पावसाने झालेले नुकसान तसेच अर्थसंकल्पात महाराष्ट्राकडे झालेले दुर्लक्ष या संदर्भात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.  गेल्याच आठवडय़ात जमीन अधिग्रहण विधेयकावरून झालेल्या कोंडीच्या पाश्र्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्या भेटीत क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याचे बोलले जात होते.  आठवडाभराच्या मुदतीत पवार आणि त्यांच्या कन्येने पंतप्रधानांची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी काँग्रेसचे नेते संशयाची भावना व्यक्त करू लागले आहेत. राष्ट्रवादीने मात्र सारे आरोप फेटाळून लावले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 3:18 am

Web Title: supriya sule meet pm modi for helping mahatastra farmer
टॅग Supriya Sule
Next Stories
1 राज्यात स्वाइन फ्लूचे संकट
2 राज्यात गोवंश हत्याबंदी
3 अवकाळी पाऊस : अर्थसंकल्पीय अधिवेशनात मदतीची घोषणा
Just Now!
X