News Flash

सूरज परमार आत्महत्या प्रकरणातील चारही आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

चारही आरोपी नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढ

ठाण्यातील बांधकाम व्यवसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्याप्रकरणातील चारही आरोपी नगरसेवकांच्या न्यायालयीन कोठडीत ११ जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सुरज परमार यांनी आत्महत्यापुर्वी लिहीलेल्या चिठ्ठीमध्ये नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांची नावे पुढे आली होती. त्याआधारे पोलिसांनी चौघांवर अटकेची कारवाई केली असून सध्या हे चौघे न्यायालयीन कोठडीत आहेत.  दरम्यान, या चौघांनी जामीनासाठी ठाणे न्यायालयात अर्ज दाखल केले होते. ते  न्यायाधीश बांबर्डे यांनी शनिवारी फेटाळून लावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2015 2:16 pm

Web Title: suraj parmar case four accused jc extended till 11 jan
Next Stories
1 मुंबई पोलिसांचे ‘ट्विटर’वर पदार्पण
2 नेहरूंनी पटेलांचे ऐकले असते तर काश्मीरचा प्रश्न उदभवलाच नसता – काँग्रेसच्या मुखपत्रात दावा
3 पाकची भूमी शापित असल्याचे भान ठेवायला हवे, शिवसेनेचा भाजपला सल्ला
Just Now!
X