05 March 2021

News Flash

सुरेंद्र थत्ते यांचे निधन

थत्ते यांच्या पार्थिवावर शनिवारी नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रा. स्व. संघाचे महाराष्ट्र प्रांताचे माजी सरकार्यवाह सुरेंद्र भास्कर थत्ते (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने नाशिक येथे निधन झाले.

थत्ते यांच्या पार्थिवावर शनिवारी नाशिक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी सुहास, मुलगा मिलिंद, मुलगी जान्हवी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. थत्ते हे गिरगावातील ठाकूरद्वार मंडळाचे स्वयंसेवक होते. पुणे विद्यापीठातून टेलिकॉम विषयातील अभियांत्रिकी पदवी त्यांनी प्राप्त केली होती. टीआयएफआरमध्ये त्यांनी काही काळ अधिकारी म्हणून नोकरी केली होती.

प्रचारक म्हणून थांबल्यावर मुंबईत गिरगाव येथे स्वत:चा सु-भास्कर या नावे अभियांत्रिकी व्यवसाय सुरू केला होता. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचे राज्यातील संघटनात्मक प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. स्वदेशी जागरण मंचाचे काम महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी व एन्रॉनविरोधी लढय़ात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2020 3:09 am

Web Title: surendra thatte passed away mppg 94
Next Stories
1 देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना इशारा; म्हणाले, “चिरडण्याची भाषा करणारे मुख्यमंत्री…”
2 राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार का?, फडणवीस म्हणतात…
3 विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना तडाखा
Just Now!
X