मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर शनिवारी दुपारी लीलावती रुग्णालयात छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास राज शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल झाले.

काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांना टेनिस खेळताना हातासोबत पाठीला व कंबरेला दुखापत झाली होता. यात पाठीच्या स्नायूंमध्ये  रक्त जमा झाले होते. त्यामुळे होणारा दबाव कमी करण्यासाठी हॅमेटोमा ड्रेनेजची छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली  दुपारी तीन वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली.